छळ मांडला!!!
गेला एक-दीड महिना भटक-भटक भटकतो आहे. अगदी मेळघाट्च्या जंगलापासून ते केरळ-कन्याकुमारीपर्यन्त जाऊन आलो आहे. आयुष्यात पहिल्यान्दा सलग एवढा फ़िरलो असेल. माझे वाढलेले वजन बरेच कमि झाले हा एक महत्वाचा फ़ायदा धरुन इतर अनेक गोष्टी य सर्व प्रवासादरम्यान शिकायला मिळत गेल्या. अनेक अनुभव मिळत गेले, अनेक माणसे भेटलीत आणि मी आतुन सम्रुद्ध (हा शब्द देवनागरीत कस लिहू जर सान्गा बर) होत गेलो . निसर्गाची अनेकविध रुपे बघितलीत आणि अधिक शान्त होत गेलो. मग ते मेळघाटचे विस्तीर्ण जंगल असो कि कन्याकुमारीचा डोळे विस्फ़ारुन टाकणारा निळाशार समुद्र किंवा मग लोणारचे सरोवर! प्रत्येकच ठिकाणी स्वत:च्या खुजेपणाची जाणीव होत गेली. मनात विचार आला, आपण माणसे कशाचा आणि का एवढा माज करतो? या भव्य निसर्गासमोर आपला अस्तित्व तरी काय? आअपण तर अगदीच क:पदार्थ.
कदाचित असे विचार आणि असे अनुभवच आपल्याल खूप काही शिकवून जात असतील. म्हणूनच प्रवासाने मनुष्य शहाणा होतो असे म्हनत असतील, नाही का ?
हा निसर्ग, हे अनुभव, प्रवासात भेटलेली माणसे, मनात येणारे विचार सगळच काही शब्दात व्यक्त करत येणार नाही कारण काही अनुभव शब्दांच्या पलिकडलेही असतातच ना, आपल्या सर्वांचेच!
पण व्यक्त करता येण्यासारखही बरंच आहे! तेच शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. वज़्ज़र, धारगद, रायपुर, केरळ आणि लोणार!
मित्रांनो, छळ मांडला आहे, सहन करायला तयार रहा!
Tuesday, October 4, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
सम्रुध्ध,समृद्ध सम्रुद्ध which ever is right take it :)
ReplyDeleteUse this editor
http://www.quillpad.in/editor.html
this is good
Tu ek travelogue lihi mandar. Avadel vachayala
ReplyDelete