Friday, March 25, 2011

सुंदर!

निघालो आहे मस्तीत वेगळ्याच,
ध्यास घेऊन सुंदरतेचा
उर भरुनी प्रत्यय घेतो
जगण्याच्या या विशालतेचा!
अश्रू सुंदर, हास्य सुंदर,
मुखामुखावरील स्मितही सुंदर
धरती सुंदर, अंबर सुंदर
माणसान्मधील प्रीतही सुंदर!
मिट्ट काळोखी अन्धारही सुंदर,
मंद प्रकाशी दीपही सुंदर
विश्वात व्यापलेला अवघ्या
जीवन्ततेचा हुंकार सुंदर!
कवेत घेऊन जगणे सारे,
मस्त मोकळा गातो आहे
हात पुढे मी पसरलेलाच
जो जे देईल घेतो आहे!
माणूस सुंदर , झाडही सुंदर
अनादी सुंदर, अनंत सुंदर
प्रत्येकामध्ये लपून आहे,
व्याप्त तो भगवंत सुंदर!
------------------------------------------

5 comments:

  1. मन निष्पाप असले कि सगळे जागच सुंदर दिसते किनई?
    मस्त आहे कविता

    ReplyDelete
  2. शेवटी माणसाच्या अंतरंगातल्या भगवंताचा शोध घेतला तर सगळ्या प्रशाना पूर्ण विराम मिलतो. समर्पक शब्दात छान मांडनि केलि आहे भविष्यातील एक नामवंत कवीचा साहित्य शेत्रात उदय होतो आहे त्याबद्दल उदंड शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. Khoop chhan aahe Kavita. Would like to see more...

    ReplyDelete