Friday, June 15, 2012

शोधा आनंद वाचनाचा !

परवा पुस्तकांचे कपाट उघडले आणि पुन्हा एकदा तो जादूचा प्रदेश माझ्यासमोर हात पसरून उभा झाला. पुन्हा एकदा  पुस्तकांचा गंध पानाप्नातून दरवळत माझ्या आत पर्यंत शिरला. तीच ती ओळखीची पुस्तक मला खुणावू लागली आणि आपसूकच हात त्यांच्याकडे वळले. त्याच त्या पुस्तकांची तीच ती जुनी पण चालताना, वाक्या गणिक आणि अक्षरा गणिक ओळखीच्या खुणा पटू लागली, नाती-गोती उजळू लागली. आणि एकदम आश्चर्य वाटला. गेली कित्येक वर्ष मी हे करतो आहे. असाच कपाट उघडून बसतो, अशीच पुस्तक चालत बसतो आणि असाच उगाच काही तरी वाचत, आठवणींमध्ये गुंगून जातो. आठवत पण नाही किती वर्ष झालीत.
केव्हा लागला हे वाचनाचे  वेड? खरच नाही आठवत. हा पण एक आठवतं. लहानपणी पासूनच मी खूप वाचायचो. जे दिसेल ते. वृत्तपत्रापासून ते रस्त्यावरच्या जाहिरातींच्या होर्दीन्ग्स पर्यंत. काय वाटेल ते! पुस्तक दिसली कि हुरळून जायचो, लहान मुल खाऊ किंवा खेळणी दिसली कि हरखून जातात तसा. सहावीत असताना आम्ही महाराष्ट्र दर्शनासाठी गेलो होतो. ज्या ज्या ठिकाणी गेलो आणि जिथे जिथे पुस्तकांची दुकाने दिसली , तिथे तिथे पुस्तक चाळली आणि आई-बाबांकडे हट्ट केला. पुस्तक पाहिजेच. आणि प्रत्येक वेळी त्यांनी मला पुस्तके आवर्जुन घेऊन दिलीत. बाहेरगावी गेल्यावर घरी परततांना त्यांनी स्वताहून माझ्यासाठी पुस्तके आणलीत. माझ्या पालकांचे हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. त्यांच्यामुळे मी वाचनाचा आनंद काय असतो हे अनुभवू शकलो.
वाचन का करावे, त्यचे उपयोग काय आहेत, त्यानी काय काय लाभ होतात या वर लांब लचक भाषण ठोकता येईल, दाखले ही देता येतील. पण मला असे वाटते कि वाचनातून जर काही मिळवायचे असेल तर, आनंद मिळवावा. आनंदासाठी वाचन करावे. वाचनातील आनंद काय असतो हे शोधून काढावे. म्हणजे मला
विचाराल तर सकाळी उठल्यावर चहा घ्यायचा, पुस्तक हातात घेऊन लोळत वाचत पडायचं, उठून आंघोळ वगैरे आटपायची, पुन्हा वाचत बसायच.    मग दुपारच जेवण, पुन्हा वाचन, मग झोप, वाचन, जेवण, वाचन आणि असाच क्रम सुरु! पुस्तकाऐवजी पेपर, मासिक किंवा दुसरे काहीही चालेल. मला वाचत बसायचा, लोळायचा पगार कुणी तरी देतो आहे आणि मी आयुष्यभर वाचत आहे असे स्वप्न तर मी किती तरी वेळा बघितले आहे. काश, यह सपना सच होता!!!
वाचनाने मला काय नाही दिले? आनंद दिला, अनुभवांचा आस्वाद घेणं शिकवलं, द्रुष्टिकोन दिला, विचार दिले, घटनांकडे बघण्याची नजर दिली, माणसे वाचण्याची सवय आणि आवड लावली, नवनवीन अनुभवांना सामोरं गेलं पाहिजे हा विचार दिल. मुख्य म्हणजे माणूसपण दिलं आणि माणसांचे महत्व ओळखायला शिकवलं. बाकी भाषण देण्यासाठी संदर्भ दिलेत वगैरे हे अतिरिक्त उपयोग!!!
असं असूनही मला खरोखर असं वटात की, अनेक उपयोग आहेत म्हणून कुणी वाचन सुरु करणार नाही. मला विचारलं तर मी हेच सांगेल, की बाबा रे आनंदासाठी वाच. discover it !!! वाचनातील आनंद काय असतो हे तू तुझे शोधून काढ. तो आनंदाचा शोध प्रत्येकाला लवकरात लवकर  लागो, हीच सदिच्छा!!