Friday, June 15, 2012

शोधा आनंद वाचनाचा !

परवा पुस्तकांचे कपाट उघडले आणि पुन्हा एकदा तो जादूचा प्रदेश माझ्यासमोर हात पसरून उभा झाला. पुन्हा एकदा  पुस्तकांचा गंध पानाप्नातून दरवळत माझ्या आत पर्यंत शिरला. तीच ती ओळखीची पुस्तक मला खुणावू लागली आणि आपसूकच हात त्यांच्याकडे वळले. त्याच त्या पुस्तकांची तीच ती जुनी पण चालताना, वाक्या गणिक आणि अक्षरा गणिक ओळखीच्या खुणा पटू लागली, नाती-गोती उजळू लागली. आणि एकदम आश्चर्य वाटला. गेली कित्येक वर्ष मी हे करतो आहे. असाच कपाट उघडून बसतो, अशीच पुस्तक चालत बसतो आणि असाच उगाच काही तरी वाचत, आठवणींमध्ये गुंगून जातो. आठवत पण नाही किती वर्ष झालीत.
केव्हा लागला हे वाचनाचे  वेड? खरच नाही आठवत. हा पण एक आठवतं. लहानपणी पासूनच मी खूप वाचायचो. जे दिसेल ते. वृत्तपत्रापासून ते रस्त्यावरच्या जाहिरातींच्या होर्दीन्ग्स पर्यंत. काय वाटेल ते! पुस्तक दिसली कि हुरळून जायचो, लहान मुल खाऊ किंवा खेळणी दिसली कि हरखून जातात तसा. सहावीत असताना आम्ही महाराष्ट्र दर्शनासाठी गेलो होतो. ज्या ज्या ठिकाणी गेलो आणि जिथे जिथे पुस्तकांची दुकाने दिसली , तिथे तिथे पुस्तक चाळली आणि आई-बाबांकडे हट्ट केला. पुस्तक पाहिजेच. आणि प्रत्येक वेळी त्यांनी मला पुस्तके आवर्जुन घेऊन दिलीत. बाहेरगावी गेल्यावर घरी परततांना त्यांनी स्वताहून माझ्यासाठी पुस्तके आणलीत. माझ्या पालकांचे हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. त्यांच्यामुळे मी वाचनाचा आनंद काय असतो हे अनुभवू शकलो.
वाचन का करावे, त्यचे उपयोग काय आहेत, त्यानी काय काय लाभ होतात या वर लांब लचक भाषण ठोकता येईल, दाखले ही देता येतील. पण मला असे वाटते कि वाचनातून जर काही मिळवायचे असेल तर, आनंद मिळवावा. आनंदासाठी वाचन करावे. वाचनातील आनंद काय असतो हे शोधून काढावे. म्हणजे मला
विचाराल तर सकाळी उठल्यावर चहा घ्यायचा, पुस्तक हातात घेऊन लोळत वाचत पडायचं, उठून आंघोळ वगैरे आटपायची, पुन्हा वाचत बसायच.    मग दुपारच जेवण, पुन्हा वाचन, मग झोप, वाचन, जेवण, वाचन आणि असाच क्रम सुरु! पुस्तकाऐवजी पेपर, मासिक किंवा दुसरे काहीही चालेल. मला वाचत बसायचा, लोळायचा पगार कुणी तरी देतो आहे आणि मी आयुष्यभर वाचत आहे असे स्वप्न तर मी किती तरी वेळा बघितले आहे. काश, यह सपना सच होता!!!
वाचनाने मला काय नाही दिले? आनंद दिला, अनुभवांचा आस्वाद घेणं शिकवलं, द्रुष्टिकोन दिला, विचार दिले, घटनांकडे बघण्याची नजर दिली, माणसे वाचण्याची सवय आणि आवड लावली, नवनवीन अनुभवांना सामोरं गेलं पाहिजे हा विचार दिल. मुख्य म्हणजे माणूसपण दिलं आणि माणसांचे महत्व ओळखायला शिकवलं. बाकी भाषण देण्यासाठी संदर्भ दिलेत वगैरे हे अतिरिक्त उपयोग!!!
असं असूनही मला खरोखर असं वटात की, अनेक उपयोग आहेत म्हणून कुणी वाचन सुरु करणार नाही. मला विचारलं तर मी हेच सांगेल, की बाबा रे आनंदासाठी वाच. discover it !!! वाचनातील आनंद काय असतो हे तू तुझे शोधून काढ. तो आनंदाचा शोध प्रत्येकाला लवकरात लवकर  लागो, हीच सदिच्छा!!

Wednesday, February 8, 2012

तीन प्रसंग......

चन्द्रपूर च्या ८५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी वार्तांकन करुन अमरावतीला परत येत होतो. संमेलन अत्यंत सुंदर झाल्यने आणि त्याचे वार्तांकन करण्याची संधी मिळाल्याने खुशीत होतो.माझ्या परिने पूर्ण प्रयत्न केले होते आणि त्यामुळे एक समाधान घेउन परतत होतो. जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत अशी माहिती मिळाली. अमरावतीसाठी थेट गाडी नाही हे कळल्यावर ब्रेक जर्नी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. नाइलाजाने चंद्रपूर ते वणी बस पकडली आणि वणीला पोचलो. पुढची यवतमाळ पर्यंतची बस यायला वेळ होता त्यामुळे बस स्थानकावर वाट बघत बसलो. शेजारी बलदंड शरीरयष्टीचा एक प्रवासी बसला होता. खांद्यावरचा चौकड्यांचा मोठा रुमाल आणि बोलण्याची ढब यावरून तो मुस्लिम समाजाचा होता हे स्पष्ट होते. ओळख झाली अन गप्पा सुरु झाल्या. मराठी साहित्य संमेलन हा काय प्रकार आहे आणि ते कशाशी खातात हे त्याचा गावीही नव्हते. किंबहुना तशी अपेक्षाही नव्हती. मी पत्रकार आहे असे त्याला सांगितले तर त्याच्या चेहर्‍यावर पत्रकाराचे साहित्य संमेलनात काय काम अस भाव प्रगटला. गप्पा पुढे सुरु झाल्या.
"कमाई तो बहुत होगी आपको?" त्याने विचारले. "ठिक -ठाक पगार मिल जाता है" इति अस्मादिक. "नही, वैसी बाकीकी कमाई?" आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. " वो धंदा नही करते है हम. एम्प्लॉई है हम. पगार मिलती है हमको", मझ्यातला मानी पत्रकार उत्तरला.
"अच्छा अच्छा. नही मैने ऐसे हि पूछा. हमारे पैचान के है एक पत्रकार. उनकी अच्छी कमाई चलती थी," असे म्हणून त्याने त्याच्या मित्राचे नाव सांगितले जो माझ्या ही ओळखीचा निघला. त्याचे नाव ऐकून जरा चमकलो


पण आश्चर्य वाटले नही.
सध्या पत्रकारितेत हे नवीन राहिलेले नाही.
कट टू अमरावती. दुसर्‍या दिवशी ऑफ़िस मध्ये बसलो होतो. ओळखीचा एक पत्रकार आला. आणि माझ्या सहकार्‍याशी गप्पा करु लागला. "फ़ोन आला होता त्याचा. बातमी छाप म्हणे माझ्या फ़ेवर ची. त्याला म्हटल पैसे किती देशील, तर म्हणाला सांगतो. साले फ़ुकटात बातमी छापून पाहीजे."
" डायरेक्ट मागितले कारे पैसे?", माझा सहकारी. " हो त्यात काय आहे. हे कमवतात आणि आपण काय तसच रहायचे?". किती हा निर्मळ्पणा स्वभावाचा! अगदी स्वच्छ विचार!
कट टू दुसरा दिवस. सकाळी ९.३० ची वेळ. एक राजकिय पक्षाच्या पीआरओचा फोन होत. ''आम्ही तुम्हाला इतक्या रकमेच्या जाहिराती देणार आहोत. आणि एक लाख रुपये तुमच्या साठी, वैयक्तिक.,"
कोणताही विचार न करता मी शांतपणे उत्तरलो. "त्या जाहिराती द्या तुम्ही. असे पैसे मी घेत नाही. त्या पण रकमेच्या जाहिरातीच द्या तुम्ही".
आणि समोरचा माणूस उत्तरला," मला वाटलच होत तू नाही म्हणशील म्हणून". आणी मग आम्ही पुढे बोलू लागलो दुसर्‍या विषयावर.
तीन प्रसंग. पत्रकारितेला लाज आणणारे. आम्ही पत्रकार खरेच एवढे भिकारी झालो आहोत का?
मल कदाचित कुणी वेड्यात ही काढतील. कारण पैसे घेण्यात काही चूक नाही, अस मानणारे अनेक जण अहेत. तालुका स्तरापासून ते आव्रुत्त्या जिथून निघतात तिथपर्यन्त सगळीकडे आहे. कुणी चिडवतील ही मला अश्या फ़ालतू प्रामाणिकपणाबद्दल. पण मला माहीत आहे मी बरोबर आहे. हा किस्सा मी घरी सांगितल्या नंतर माझ्या घरच्यांच्या चेहर्‍यावर जो आनंद आणि अभिमान दिसला, तो अशा अनेक रुपयांपेक्षा मोठा आहे. आणि असा काहि मी एक्टाच नाही. अजूनही पत्रकारितेत अनेक प्रामाणिक माणस आहेत. चला आशा करु या, की ही संख्या सतत वाढत राहो.
ता.क. हा माझ्या प्रामाणिकपणाचा डंका नाही. तर वस्तुनिष्ठ वार्तांकन अहे. झालेल्या घटनांचे जसेच्या तसे.

Monday, October 10, 2011

What Anna's recent agitation did is that it not only captivated the minds of numerous youths in the country but also motivated them to do something constructive for their motherland and development of the society where they live in. Taking inspiration from that movement and hearing to his inner voice Balasaheb Darade, a well educated youth has came back to Lonar to throw himself in the development work of Lonar and villages around.
Dreaming to bring glory for his own place and setting a role model of sustainable development of villages, Balasaheb Darade has returned to Lonar leaving his lucrative salaries jobs and promising carrer. An Electronics and Telecommnication Engineer from Jawaharlal Nehru Engineeing College, Aurangabad, Darade did his Masters of Science in Electrical Engineering from University of Cincinnati, USA. He also worked with many reputed companies in the field of IT in India and abroad.
Balasaheb was associated with the Art of Living movement of Sri Sri Ravishankar even when he was doing his jobs and still an active member. He always had participated in the construtive activities of Art of Living movement. During Anna's fast at Delhi he took part in that agitation and huge repsonse to Anna's struggle gave boost to hidden urge in the heart of Darade. " I thought this is the right time to give proper direction to the energy in youths and to start constructive work. I wanted to do something for my village and area around from where I rose up. I wanted to pay back to my place and decided to get settle here," told Balasaheb while talking The Hitavada.
After coming back to Lonar, Balasaheb has now started to gather youths in Lonar and motivationg youths in and around the place. Presently he has decided to work on creating sustainable model village considering 12 developmental parameters such as health, hygiene, food, water, shelter, education, income generation/job creation, energy, social equity, connectivity, spiritual well being & public domain. He also eyes to empower youth and leaders in villages to take responsibilities to uplift life in villages. He knows that this is a very difficult and long process and results are not to get in immediate future. But this youth with dreamy eyes is hopeful about good results and believes that youths in rural parts will bring changes and boost the development process. He already has started efforts in that direction and meeting with several stakeholders to catalyse the development of Lonar and surround areas. He sees many things which can be counted and used for developing this rural part. He has chalked down some plans and started work on those plans.
" I believe that once you have achieved certain things, you must share those with others who need it most. I wants to serve for my motherland so I came back. I get satisfaction from this work. Journey has just begun and I have long terms goals. Youths are giving good response to me and I hope only good will come out of the collective efforts," shared Balasaheb.


Achievements and awards of Balasaheb Darade

* Resident Education and Development Outstanding Student Leader Award, University of Cincinnati, 2009.
* University Graduate Scholarship (UGS), University of Cincinnati, 2007-09.
* Outstanding Engineering Student award, IEEE, 2004.
* Outstanding Engineering Student, Dr B.A.M. University, 2003-04.
* Distinguished Alumni, JNEC Aurangabad.
* Government of India Scholarship for Engg Education 2001-2005
* LONAR RATNA, Award for Scientific Contribution for development of Lonar Crater, 2006.
* Best Paper Award (First position) in International conference on Systematics, Cybernetics and Informatics 2007
* First Prize: IMS (Indian Microelectronics Society Conference), 2005.
* First Prize: UG/PG Student Contest, IEEE Communication Society, 2004.
* First Prize: Hardware/software Project Contest, VIT IEEE SB, 2005.

-------------------------------------------------------------

Two new species at Lonar crater

In a shocking thruth came to fore, two new species are found in the famous Lonar crater in Buldana district which has proved that the salinity of Lonar crater is reducing and life structure at this meteoric crater is changing gradually. Scientists have confirmed this fact giving reason that the drainage in surrounding premices of the world famous crater is mixing in it and creating threat for the crater.
Lonar crater is the world's only meteoric impact crater in Basalt rock and has internatioal importance. Many renowned organisations and scientists are still doing research on the life in Lonar crater and many secrets are yet to be resolved. Till now, species eating Methane as well as with magnetic properties are also found here. Development of many life cycles are still going on in the Lonar crater and hence Lonar falls in highly protected natural places category. Unfortunately, due to excessive presence of humans in crater area, human interferance and encroachment has caused the threat to all pecularities of Lonar.
Khagol Vishwa, a Pune based organisation working in the field of Science has started the campaign for Lonar crater conservation and protection and recently did the survey at Lonar lake on Oct 2. Khagl Vishwa found two species Corixa and Eristalis larva or rat tailed maggot. These are the first species found in Lonar crater other than the microorganisms in Lonar. Development of life in Lonar lake is considered as impossible due to its high salinity but presence of Corixa and Eristalis larva have proved that the structure of Lonar crater has started Changing. As these two species are generally found in soft water, there presence at Lonar crater has proven that original properties of Lonar crater are changing.
National Center For Cell Science has started further study on these two species and senior zoologist Dr Hemant Ghate from Pune has done their identification. While speaking to The Hitavada Dr Ghate confirmed that these two species are generally found in fresh water and sewage water. " Eristalis larva is generally found in human sewage. Its presene in Lonar crater proves that sewage water is mixing with lake water at Lonar and causing the sewage pollution. Corixa is a species in fresh water and as it is found in Lonar it proves that the salinity of Lonar is decreasing. This may change the original life cycle at Lonar lake and it is necessary to take urgent steps to stop mixing of any other water than the original. Otherwise the rare lives at Lonar will come to an end due to human interferance, " said Dr Ghate.


LOnar crater is considered as around 50,000 years old crater and is young as compared to other craters in the world. It has extreme importance from geological and ecological point of view. Rare life cycles are developed here in saline water in adverse conditions. Existence of historical temples in and around crater, existence of numerous species in crater area and other biologically importance things make this crater elligible to be included in the list of world heritage. NASA, Smithsonian Institute, US Geological Survey, Geological Survey of India, National Center for CEll Sciences, Agharkar Research Institute, Pune, National Institute of Oceanography, IIts and many other universities are doing research on this crater since last two decades.
----------------------------------------------------------

Tuesday, October 4, 2011

छळ मांडला!!!

गेला एक-दीड महिना भटक-भटक भटकतो आहे. अगदी मेळघाट्च्या जंगलापासून ते केरळ-कन्याकुमारीपर्यन्त जाऊन आलो आहे. आयुष्यात पहिल्यान्दा सलग एवढा फ़िरलो असेल. माझे वाढलेले वजन बरेच कमि झाले हा एक महत्वाचा फ़ायदा धरुन इतर अनेक गोष्टी य सर्व प्रवासादरम्यान शिकायला मिळत गेल्या. अनेक अनुभव मिळत गेले, अनेक माणसे भेटलीत आणि मी आतुन सम्रुद्ध (हा शब्द देवनागरीत कस लिहू जर सान्गा बर) होत गेलो . निसर्गाची अनेकविध रुपे बघितलीत आणि अधिक शान्त होत गेलो. मग ते मेळघाटचे विस्तीर्ण जंगल असो कि कन्याकुमारीचा डोळे विस्फ़ारुन टाकणारा निळाशार समुद्र किंवा मग लोणारचे सरोवर! प्रत्येकच ठिकाणी स्वत:च्या खुजेपणाची जाणीव होत गेली. मनात विचार आला, आपण माणसे कशाचा आणि का एवढा माज करतो? या भव्य निसर्गासमोर आपला अस्तित्व तरी काय? आअपण तर अगदीच क:पदार्थ.
कदाचित असे विचार आणि असे अनुभवच आपल्याल खूप काही शिकवून जात असतील. म्हणूनच प्रवासाने मनुष्य शहाणा होतो असे म्हनत असतील, नाही का ?
हा निसर्ग, हे अनुभव, प्रवासात भेटलेली माणसे, मनात येणारे विचार सगळच काही शब्दात व्यक्त करत येणार नाही कारण काही अनुभव शब्दांच्या पलिकडलेही असतातच ना, आपल्या सर्वांचेच!
पण व्यक्त करता येण्यासारखही बरंच आहे! तेच शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. वज़्ज़र, धारगद, रायपुर, केरळ आणि लोणार!
मित्रांनो, छळ मांडला आहे, सहन करायला तयार रहा!

Friday, March 25, 2011

सुंदर!

निघालो आहे मस्तीत वेगळ्याच,
ध्यास घेऊन सुंदरतेचा
उर भरुनी प्रत्यय घेतो
जगण्याच्या या विशालतेचा!
अश्रू सुंदर, हास्य सुंदर,
मुखामुखावरील स्मितही सुंदर
धरती सुंदर, अंबर सुंदर
माणसान्मधील प्रीतही सुंदर!
मिट्ट काळोखी अन्धारही सुंदर,
मंद प्रकाशी दीपही सुंदर
विश्वात व्यापलेला अवघ्या
जीवन्ततेचा हुंकार सुंदर!
कवेत घेऊन जगणे सारे,
मस्त मोकळा गातो आहे
हात पुढे मी पसरलेलाच
जो जे देईल घेतो आहे!
माणूस सुंदर , झाडही सुंदर
अनादी सुंदर, अनंत सुंदर
प्रत्येकामध्ये लपून आहे,
व्याप्त तो भगवंत सुंदर!
------------------------------------------

Tuesday, May 18, 2010

नक्षलवाद तुमच्या दारातही येऊ शकतो!

दांतेवाडा घटनेने हादरलेल्या प्रशासन आणि शासनाला सावरायलाही वेळ न देता, नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ मध्ये पुन्हा एक बस उडवून सर्वांना जोराचा धक्का दिला. या आणि अशा अनेक घटना घडल्यावर आपण नक्षल्यांवर टिका करतो आणि ते कसे चुकीचे आहेत हे स्वत: ला व इतरांना पटवून सांगतो. नक्षलवाद्यांचा मार्ग पटो अथवा न पटो, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक कुतुहल त्यांच्या बद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल नेहमीच असते. आणि तरी सुद्धा कुठेतरी नक्षल्यांबद्दल मनात रागच जास्त असतो.
पिचलेल्या जनतेला न्याय देण्याच्या उदात्त भावनेतून चारु मुझुमदारांनी सुरु केलेली ही चळवळ आज, त्याच जनसामान्यांच्या विरोधात जात असुन त्यांच्यातच नवीन जमीनदार आणि बुर्ज़्वा लोक तयार होत आहेत. आज जरी या चळवळीची दिशा चुकली असेल आणि तिचे मार्गक्रमण हे दहशतवादी संघटनेकडे सुरु असेल, तरी जी परिस्थिती प्रखरपणे या चळवळीने जगापुढे आणली, ती परिस्थिती आज देखील कायम आहे, वेष्टन बदललेल्या स्वरुपात!
आज देखील सरकारी यन्त्रणेची मुजोरी तितकीच आहे, निर्ढावलेपणा तसाच आहे, माहिती अधिकार कायदा येउन सुद्धा त्यांचे छुपे व्यवहार व गरिबांना नाडणे तसेच सुरु आहे. अधिकारी, नेते, गुंड आणि उद्योगपती यांचे साटे लोटे तसेच सुरु आहे. प्रत्येक जातीतील ठराविक लोक सोडले तर अनेक जण 'वंचित' या एकाच जातीत सामावणारे आहेत. त्रास खेड्यातच आहेत असे नाही, ते शहरातही आहेतच, त्यांचे स्वरुप वेगळे असेल. आमच्या देशातील जे भाग १९४७ साली मागास होते, ते आजही मागास श्रेणीतच मोडतात. आहे रे आणि नाही रे यांच्यातील दरी विस्तीर्ण होत आहे. आमच्या देशातील सर्वच जाती समूहांना असुरक्षित वाटत आहे. अशी सर्व परिस्थिती ही नक्षलवादासाठी अत्यंत पोषक असते. याचाच अर्थ आमची शहरे देखील नक्षली गटांची ठिकाणे बनू शकतात. चळवळीला प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी तिला बुद्धिवंतांची साथ लाभणे आवश्यक असते. काही वर्षांपूर्वी विद्यापीठांमधून शिकणार्‍या कम्युनिस्ट व जहाल डाव्या विचारवंतांनी, कलावंतानी, साहित्यिकांनी नक्षल चळवळीला अशी वैचारिक साथ दिली होती. त्यामुळेच या चळवळीला तात्त्विक अधिष्ठान प्राप्त झाले; अन्यथा ती मुस्लिम दहशतवादी चळवळीच्या मार्गाने गेली असती. आज ती त्याच मार्गाने चाललेली आहे. तिला पुन्हा सुशिक्षित तरुणांकडून समर्थन मिळू द्यायचे नसेल तर सरकार प्रमाणेच अम्हालाहि काही तरी पुढाकार घेऊन करावे लागेल. सरकार ने विकास कामांना आदिवासी भागात गती दिली पाहिजे, सुविधा पुरवल्या पाहिजेत, सरकारी यन्त्रणा अधिक माणुसकीपूर्ण झाली पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. तसेच नागरिक म्हणून आपण काय करु शकतो याच देखिल प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. लहान पणापासून राष्ट्रवादाची भावना रुजविणे, सर्व काही मीच न ओढता वंचितांना काही देण्याची तयारी ठेवणे, त्या वंचितांपर्यन्त पोचण्याची, जाण्याची तयारी ठेवणे आणि नक्षली चळवळीला समर्थन करणार्‍यांचा विरोध करणे, आपापल्या ठिकणी हे आपण नक्कीच करु शकतो. गडचिरोलिला जाऊन एक वेगळे टुरीजम करणे, ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या पैश्यावर पोसलेल्या आपल्या देशद्रोही मिडियाचा विरोध करणे हे ही आपण करु शकतो. हे खूप सोपे उपाय झालेत. काही उपाय आपण ही सुचवू शकता. मला अपेक्षा आहे प्रतिक्रियांची आणि ऊपायांची! वाट बघतो आहे!
-------------------------------------------------------